About Us

Where Success Begins

वर्षानुवर्षे ऋतुचक्र निर्मित ऊन, थंडी,वारा,पाऊस यानां समर्थपणे तोंड देत असतानाच आपल्या शीतल छायॆखाली पांथस्थांना सावली देणार्‍या महान वटवृक्षाप्रमाणे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली 99 र्वर्षे अव्याहतपणे आपल्या धार्मिक सामाजिक , शैक्षणिक , आणि सांस्कृतिक कार्याद्वारे लालबाग,चिंचपोकळी सारख्या कामगार विभागात कार्यरत आहे.सार्वजनिक उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना उत्सवातून अभिप्रेत असलेले समाजप्रबोधन आणि लोकशिक्षणाचे कार्य हेच या उत्सव मंडळाच्या कार्याचे मूळसूत्र आहे.
१९२० साल म्हणजे ऎन धामधुमीचे दिवस.स्वातंत्र्य हेच त्या पिढीचे स्वप्न होते.आजच्या सारखी भोंगी संस्कृती सोडून त्यागी संस्कृतीचे पाईक होण्याचे त्यावेळच्या समाजधुरीणांचे ध्येय होते.लोकमान्यांचा आदर्श बाळगणारे त्यावेळचे या विभागतील कै.दत्त्ताराम अर्जुन पुजारे,कै. महादेव बसनाक, कै.दत्त्ताराम रामचंद्र मयेकर, कॅप्टन ल.त्र्य.पाटणकर इत्यादींनी मंडळ स्थपनेत पुढाकार घेतला आणि नंतर कै.पांडुरंग म्हसकर,कै.गुणाजी सिताराम बागवे,कै.लक्ष्मण चव्हाण यांनी या कार्याची धुरा समर्थपणे पेलली.त्यावेळी मंडळाचे कार्यक्षेत्र होते लक्ष्मी नारायण व्यायाम शाळा ते काळाचौक रोड,शिवडी ते भारतमाता सिनेमापर्यंत वर्गणी होती फक्त चार आणे.
मंडळाणे प्रथम मुर्ती बसविली ती डेक्कन कोरच्या जागेत. तेथून पुढे बावला बिल्डिंग क्रमांक १ च्या जागेत,तेथून वाण्याची चाळ, भारतीय तरुण संघाची जागा व नंतर १९३९ साली उत्सव मंडळ आजच्या जागेत स्थिरावले.१९४४ साली मंडळाच्या रौप्यमहोत्सव साजरा झाला.१९५६ साली मंडळाची घटना तयार झाली व मंडळाचे "चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ " हे व्यापक नाव देण्यात आले.उद्देश एवढाच की,मंडळाचे कार्य गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता मंडळ वर्षभर कार्यरत रहावे. 

Read more