श्री विघ्नेश्वर

श्री विघ्नेश्वर हे देवस्थान ओझर येथे असून पुणे जिल्हयातील जुन्नर तालुकयामध्ये स्थित आहे.
नारायणगाव पासून ओझरचे अंतर १२ किमी आहे. तर पुण्यापासून ओझर अंतर १०० किमी आहे.
जुन्नरपासून ओझरचे अंतर ८ किमी आहे.
१. ओझरला जाण्यासाठी एस.टी बस नसल्याने आपल्याला जुन्नरपासुन रिक्षा,जीप इ.सोय आहे.
२. शिवाजीनगर बस स्थानक-पुणे येथुन नियमित बस वाहतुक व्यवस्थेची सोय आहे.
३. मुंबई पासून ,ठाणे -कल्याण-बापसाई- सरळगाव मार्गे १८२ ओझर किमी आहे.

श्री बल्लाळेश्वर

पाली,जिल्हा रायगड ,तालुका सुधागड.नागोठाणे गावा नजीक.
श्री बल्लाळेश्वर हे देवस्थान पाली गावामध्ये असून कर्जत पासून ३० किमी अंतरावर आहे.
१.मुंबई पासून पनवेल - खोपोली मार्गे , पालीचे अंतर १२४ किमी आहे . पाली ,पनवेल - पेण - वडखल - नागोठाणे आणि वाखेण मार्गे १२० किमी अंतरावर आहे.
२. पुण्यापासून लोणावळा आणि खोपोली मार्गे पाली १११ किमी अंतरावर आहे.
३. मुंबई पासून पुणे ,खोपोली ,कर्जत , पनवेल नियमित बस सेवा उपलब्ध आहे. 

श्री वरदविनायक

महड,जिल्हा रायगड , तालुका खालापुर
श्री वरदविनायक हे देवस्थान महड येथे आहे.
१.मुंबई - महड अंतर ६३ किमी आहे.
२. मुंबई - पनवेल मार्गा वरुन महड २४ किमी अंतरावर आहे.
३. खोपोली आणि कर्जत पासून नियमित राज्य वाहतुक बस सेवा उपलब्ध आहेत.

श्री महागणपति

रांजणगाव , पुणे - अहमदनगर महामार्गा वर
श्री महागणपतिचे देवस्थान आहे.
पुणे - अहमदनगर पासून रांजणगाव येथे जाण्यासाठी राज्य वाहतुक बस सेवा उपलब्ध आहेत.
१. पुणे - अहमदनगर महामार्गापासून रांजणगाव पुण्यापासून ५० किमी आहे.

श्री गिरीजात्मजा

लेण्याद्री .पुणे - नाशिक महामार्गावरुन लेण्याद्रीचे चाकण -राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - जुन्नर मार्गे अंतर ११० किमी आहे.
१. पुणे ,तळेगाव ही नजीकची व सोईस्कर रेल्वे स्थानके.
२. जुन्नर पासून लेण्याद्री ५ किमी आहे.प्रथम जुन्नर येथे येऊन लेण्याद्रीला जाण्यासाठी रिक्षा , जीप , बसची सोय आहे.
३. जुन्नर पासुन शिवाजीनगर बस स्थानक पुणे येथुन नियमित
राज्य बस वाहतुक सेवा उपलब्ध आहे तसेच मध्य मुंबई बस स्थानका पासुन ही सोय उपलब्ध आहे.
४. मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी तब्बल ३०७ पायर्‍या
आहेत . पायर्‍या चढण्यास असर्मथ असणार्‍या भक्तांसाठी पालखीची , डोलीची सोय आहे.

श्री मोरेश्वर

मोरगाव . मोरगावला जाण्यास अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
१. स्वारगेट बस स्थानक पुणे पासुन राज्य बस वाहतुक सेवा उपलब्ध आहे .
२. पुणे - सोलापुर महामार्गावरुन पुण्यापासून ५६ किमी अंतर आहे. मोरगाव चौफुलाच्या उजव्या बाजुला स्थित आहे.
मोरगावचे ,पुणे - हडपसर - लोणी - चौफुला - सुपा मार्गे अंतर ७९ किमी आहे.
३ . दुसरा मुख्य मार्ग म्हणजे हडपसर -सासवड - जेजुरी मार्गे मोरगाव ६४ किमी आहे.
४.मोरगावच्या रस्त्यावर जेजुरी पासून १५ किमी अंतरावर असलेल्या खंडोबा देवाचेही दर्शन घ्यावयास मिळते .
५. पुणे - सोलापुर रेल्वे स्थानका वरुन निरा स्थानकावर उतरुन मोरगावला बसने जाण्याची सोय आहे.
६. पुणे - दौंड रेल्वे स्थानका वरुन कडगावला उतरुन मोरगावला एस.टी जाण्याची सोय आहे.

श्री चिंतामणी

थेऊर जिल्हा पुणे , तालुका हवेली . थेऊर पुण्यापासून २५ किमी अंतरावर आहे.
मुळा , मुठा आणि भिमा नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे.
थेऊर जाण्यास अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
१. सारसबाग आणि पुलगेट पासुन नियमित पी. एम. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
२. थेऊरचे पुणे - सोलापुर महामार्गावरुन हडपसर लोणी नंतर ३ किमी अंतर आहे. थेऊरला जाण्यास लोणी वरुन लहान रस्ता देखील आहे.

श्री सिध्दिविनायक

सिध्दटेक हे भिमा नदीच्या काठावर वसलेले आहे.
अहमदनगर जिल्हातील कर्जत तालुकयात एस.टीची देखील
सोय आहे.
१. सिध्दटेकला जाण्यासाठी दौंड रेल्वेस्थानक सोईस्कर आहे.
पुणे - सोलापुर रेल्वे मार्गा वरुन ( पुण्यापासून हडपसर -लोणी - चौफुला - आणि पटस मार्गे दौंड ७८ किमी आहे.)
दौंड -सिध्दटेक १८ किमी आहे.
सिध्दटेकपासून १ किमी शिरपुर पासुन राज्य वाहतुक सेवा उपलब्ध आहे.शिरपुर पासुन १ किमी चालत गेल्यास भिमा नदी येते.
२. मंबई पासून सिध्दटेकला पटस - बिगवन - राशिन - मर्गे जाता येते.
३. सिध्दटेकला दूरच्या मार्गाने दौंड - काष्टी - पेडगाव मार्गे अंतर ४८ किमी आहे.